Ad will apear here
Next
रोटरी क्लब आणि गिरिप्रेमी करणार बचावदूतांचा गौरव
शनिवारी पुण्यात सत्कार सोहळ्याचे आयोजन

पुणे : ‘सह्याद्रीच्या डोंगररांगांत, कड्याकपारीत आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी धावून जाणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व गिरिप्रेमी यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी, १६ नोव्हेंबर २०१९ रोजी आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, या वेळी बचावदूत आपल्या अनुभवांचे कथन करणार आहेत,’ अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे अध्यक्ष मुकुंद चिपळूणकर व ‘गिरिप्रेमी’चे समन्वयक व ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘या कार्यक्रमात बचावकार्यात अग्रगण्य असणाऱ्या सात संस्था आणि सहा बचावदूतांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवदुर्ग मित्र ट्रेकिंग अँड अॅडव्हेंचर क्लब, वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण, निसर्गमित्र, महाबळेश्वर ट्रेकर्स, भोसला अॅडव्हेंचर फाउंडेशन, कर्तव्य बहुद्देशीय संस्था, सह्याद्री ट्रेकर्स या संस्था आणि संतोष दगडे, गुरुनाथ अगिवळे, गणपत व्होळे, कोंडू वारे, बाळू धनगर व सुरेश बोडके या बचावदूतांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. डोंगरदऱ्यात अडचणीच्या वेळी फक्त एका विनंतीवर धावून जाणारे हे बचावदूत खऱ्या अर्थाने देवदूतच आहेत. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे,’ असे मुकुंद चिपळूणकर यांनी सांगितले. 

‘सन्मानार्थी संस्था व व्यक्ती महाराष्ट्र माउंटनीअरिंग रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर (एमएमआरसीसी) या संस्थेशी संलग्न असून, गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनीअरिंगने (जिजिआयएम)तिची स्थापना केली आहे. ‘एमएमआरसीसी’ द्वारे २०१६ पासून आपत्कालीन स्थितीत बचाव व मदत करण्यासाठी २४ बाय ७ हेल्पलाइन चालवली जात असून, कुठल्याही मोबदल्याशिवाय हे काम केले जाते. आत्तापर्यंत ३०० हून अधिक लोकांना मदत केली आहे. ‘एमएमआरसीसी’च्या माध्यमातून हे बचावदूत एका व्यासपीठावर आले, त्यामुळे समन्वय साधणे आणि मदत लवकर पोहोचवणे शक्य झाले आहे. हे सर्व बचावदूत आजच्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांचा सन्मान होतो आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोने यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहेत,’ अशी भावना उमेश झिरपे यांनी व्यक्त केली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVVCG
Similar Posts
साने गुरुजी रुग्णालयास डॉ. कांचन जोशी यांच्याकडून निधी पुणे : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या साने गुरुजी रुग्णालयास डॉ. कांचन अजेय जोशी यांच्या वतीने पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. नामवंत बालरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. अजेय जोशी यांच्या स्मरणार्थ साने गुरुजी रुग्णालयात बालकांसाठी आय .सी. यू . युनिट उभारले जाणार आहे
‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ची अंतिम फेरी सोमवारी पुणे : व्हाइट डिव्हाइन इव्हेंट्स आणि डॉक्टर ऑन कॉल बाय पिनॅकल ग्रुप यांच्या वतीने आयोजित ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी येत्या सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता नवले लॉन्स येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात ‘डॉक्टर ऑन कॉल’ या मोबाइल अॅपचे उद्घाटनही होणार आहे,’ अशी माहिती संयोजिका व्हाइट डिव्हाइनच्या संस्थापक डॉ
उलगडला कांचनजुंगा मोहिमेचा थरार! पुणे : गच्च भरलेले बालगंधर्व रंगमंदिर, क्षणाक्षणाला वाढती उत्कंठता, खिळवून ठेवणारी चलचित्रे अन शिखरमाथ्यावर भारताचा तिरंगा फडकण्याची दृश्ये समोर येताच, सभागृहात झालेला टाळ्यांचा कडकडाट. निमित्त होते ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट कांचनजुंगा इको एक्स्पीडिशन २०१९’चा रोमहर्षक प्रवास पडद्यावर उलगडणाऱ्या ‘कांचनजुंगा-रत्नांचे
उमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई पुणे : गिरिप्रेमी या प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या प्रमुख मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांनी ‘माउंट मेरा’ या नेपाळमधील सहा हजार ४७६ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांनी ही चढाई एकट्याने (सोलो) केली. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झिरपे ‘माउंट मेरा’ शिखरावर पोहोचले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language